आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांना या वर्षीचा अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांचा सर्वोत्कृष्ट गीतकार कवीश्रेष्ठ ग.दि.माडगुळकर पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा शुक्रवारी (9 मार्च) ला करण्यात आली आहे.
पुरस्काराचे वितरण कधी?
मुंबईमध्ये शनिवारी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. 21 हजार रूपये मानपत्र मानचिन्ह गौरव, वस्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार शनिवार 11 मार्चला मुंबईतील दादर येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सन्मान पूर्वक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे चित्रपट महोत्सवात हा कार्यक्रम होणार आहे, असे पत्राद्वारे अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी कळविले आहे.
कोण आहेत बाबासाहेब सौदागर?
कवी बाबासाहेब सौदागर यांनी 80 पेक्षा अधिक चित्रपटांचे गीतलेखन केले आहे. 27 मालिकांसाठी सौदागर यांनी गीतलेखन केले आहे.अनेक चित्रपटात मुख्य भूमिका देखील त्यांनी केलेल्या आहेत.चित्रपटांच्या कथा पटकथा, संवाद आहेत.
चित्रपटातील गाणी लोकप्रीय
"राजमाता जिजाऊ',"मी सिंधुताई सपकाळ', "घुंगराच्या नादात', "सत्ताधीश', "झुंजार', "झुंज' 'एकाकी','उमंग',"शिवा',"तुझा दुरावा:, "मध्यमवर्ग','सासरची का माहेरची', "चंद्रभागा','लेक लाडकी','जुगाड',या मराठी चित्रपटातील त्यांची गाणी लोकप्रिय झालेली आहेत.
"स्वराज्य रक्षक संभाजी' "स्वराज्य जननी जिजामाता' ,"आशा अभिलाषा' "चिमणी पाखरं',"बंदीशाळा' या मालिकांतील सर्व गीते लोकप्रिय झालेली आहेत.त्यांचे "सांजगंध*पिवळण*चित्ररंग'हे कविता संग्रह चित्रपट गीत संग्रह प्रकाशित झाले आहेत.
भंडारभुल ही कादंबरी पुणे विद्यापीठ अभ्यासक्रमात होती.'पायपोळ' हे वास्तव चित्रण असणारे आत्मचरित्र लोकप्रिय ठरलेले आहे. "घुंगराच्या नादात" सत्ताधीश, शिवा तुझा दुरावा ,गणगौळण ,या चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भुमिका केल्या आहेत.
या लेखन कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसे पत्र महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे आणि कार्यकारी संचालक निर्माते संजय दिक्षित यांनी शुक्रवारी 9 मार्चला सौदागर यांना दिले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.