आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:बुरुडगाव रोडवर जुगार अड्ड्यावर छापा; सहा जणांना अटक

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तिरट जुगार खेळणाऱ्या सहा जणांना कोतवाली पोलिसांनी छापा टाकून पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य असा १४ हजार ३८० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अंमलदार अतुल काजळे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री बुरूडगाव रोडवरील नक्षत्र लॉनच्या पाठीमागील बाजूला भाजी गोडाऊनच्या आडोशाला ही कारवाई केली.

मोनिरूल अब्दुल रोशीद शेख (वय ३५), विरेंद्र श्री कृष्णपाल (वय १९), उदय जोगराम विर (वय २० सर्व रा. बुरूडगाव रोड), करण अशोक लोखंडे (वय 22 रा. आष्टी, जि. बीड), बाबासाहेब पोपट गायकवाड (वय २९रा. अरणगाव रोड), शिवा महानंद विश्‍वास (वय १९ रा. बुरूडगाव रोड) अशी पकडलेल्या जुगार्‍यांची नावे आहेत. बुरूडगाव रोडवरील नक्षत्र लॉन परिसरात काही व्यक्ती तिरट जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, अमोल गाढे, सागर पालवे, संदीप थोरात यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांनी नक्षत्र लॉनच्या पाठीमागील बाजूला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...