आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्कृष्ट तीन सार्वजनिक गणेश मंडळांना पुरस्कार देण्यात येणार:श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांची माहिती

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वांनी शांततेत गणेश उत्सव साजरा करावा. श्रीगोंदे शहरातील सार्वजनिक गणपती मंडळांची पाहणी करून उत्कृष्ट देखावा, उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम व शिस्तबद्ध मिरवणूक काढणाऱ्या 3 मंडळांना पोलिस स्टेशनच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली.

श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात मंगळवारी (30 ऑगस्ट) शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या बैठकीला श्रीगोंदे शहरातील व तालुक्यामधील 25 सार्वजनिक गणपती मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पारंपरिक वाद्य ठेवावेत

सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत पोलिस निरीक्षक ढिकले यांनी माहिती दिली. ढिकले म्हणाले, गणपती मंडळांनी धर्माचा, जातीचा, पंथाचा व नागरिकांच्या भावना दुखवल्या जातील, आशा पद्धतीचे देखावे तयार करू नयेत. स्टेज तयार करताना मजबूत करावे. पावसाळ्याचे दिवस असल्याने देखावे अथवा मूर्ती पावसात भिजणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

ऑनलाईन अर्ज करावा

इलेक्ट्रीक/लाईटच्या वायरींग व्यवस्थित असाव्यात. गणेश मूर्तीजवळ मंडळाचा स्वयंसेवक 24 तास हजर राहील, याची दक्षता घ्यावी. विसर्जन मिरवणूक काढताना पारंपरिक वाद्य ठेवावेत तसेच मिरवणूक शिस्तबद्धा काढाव्यात. परवानगी घेताना ऑनलाईन अर्ज करावा. परवानगी अर्जामध्ये कमीतकमी 10 सदस्यांची नावे व पत्ते नमूद करावेत, आदी महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिल्या.

समिती स्थापन

श्रीगोंदे शहरातील सार्वजनिक गणपती मंडळांची पाहणी करून उत्कृष्ट देखावा, उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम व शिस्तबद्ध मिरवणूक काढणाऱ्या 3 मंडळांना पोलिस स्टेशनच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार आहे. गणेश मंडळांची निवड करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक ढिकले यांनी दिली.

बाधा आणणाऱ्याविरुद्ध कारवाई

गणशोत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी शांततेत व समाजिक सलोखा राखून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...