आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश जयंती निमित्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी:अहमदनगरच्या श्री विशाल गणेश मंदिरात पुष्पवृष्टी

अहमदनगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री गणेश जयंतीनिमित्त अहमदनगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात बुधवार (25 जानेवारी) ला भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी रांगेत होती. दरम्यान शहरातील अन्य गणेश मंदिरामध्ये देखील भाविकांनी गर्दी केली होती. अष्टविनायकापैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील गणेश मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

अहमदनगरचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात उद्योजक प्रकाश मुनोत, महेश मुनोत व गणेश पालवे परिवाराच्यावतीने महापुजा करुन आरती करण्यात आली. याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, बापूसाहेब एकाडे, हरिभाऊ फुलसौंदर, रंगनाथ फुलसौंदर, ज्ञानेश्वर रासकर, पांडूरंग नन्नवरे, गजानन ससाणे, हरिश्चंद्र गिरमे, चंद्रकांत फुलारी, संजय चाफे, प्रा.माणिक विधाते, नितीन पुंड, पुजारी संगमनाथ महाराज उपस्थित होते.

प्रारंभी अभिषेक करण्यात आला. भाविकांनी पहाटे पासून रांगा लावल्या होत्या. दुपारी गणेश जन्मवेळी यावेळी भाविकांनी पुष्पसृष्टी केली. यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. गणेश जयंतीनिमित्त मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. देवस्थान ट्रस्टच्यावतीने भाविकांसाठी मंडप, बॅरिगेटस्, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गणेश मंदिरातील सेवेकरी व पोलिस प्रशासन भाविकांची गर्दीेचे नियोजन करत होते.

यावेळी देवस्थानच्यावतीने मुनोत परिवार व पालवे परिवार यांच्या श्री विशाल गणेशाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी छाया मुनोत, मोहित मुनोत, प्रज्ञा मुनोत, कमल पालवे, शिवम पालवे, योगिता पालवे आदि उपस्थित होते.

दरम्यान गणेश जयंती निमित्त शहरातील दातरंगे मळा येथील एकदंत कॉलनीतील एकदंत गणेश मंदिरात महाअभिषेक व होमहवन करण्यात आले. त्यावेळी एकदंत गणेश मंडळांच्या वतीने शहरातुन भव्य पालखी मिरवणुक काढण्यात आली.मिरवणुकीत महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...