आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Ganeshotsava 2022 | Ahemadnagar Update | Bappa Comes In Different Forms From The Same Soil For 13 Years..! An Initiative Of The Bidkar Family In Kelgaon

13 वर्षांपासून एकाच मातीपासून वेगवेगळ्या रूपात येतात बाप्पा..!:केळगावातील बीडकर कुटुंबाचा उपक्रम

अनिल हिवाळे | अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमूळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व गणेश मूर्तीची अवहेलना थांबवण्यासाठी गेल्या तेरा वर्षांपासून एकाच मातीपासून गणेशोत्सवात रूपात गणपती बाप्पा येतात. हा अनोखा उपक्रम केडगाव येथील बीडकर कुटुंबीय राबवत आहेत. गेल्या 13 वर्षापासून (2010) दरवर्षी शाडुमातीच्या दोन मूर्ती आम्ही सर्व परिवार मिळून तयार करतो. एक आमच्यासाठी व एक बहिणीसाठी मूर्ती तयार करत असल्याची प्रतिक्रिया बीडकर यांनी दिली.

माती सुकवून ठेवतात घरात

बीडकर यांनी सांगितले की, मूर्ती घरीच बादलीत विसर्जन करून ती माती कडक उन्हात सुकवून घरात सांभाळून ठेवतो. पुढील वर्षी तिच माती वापरून पुन्हा दोन गणेशमूर्ती तयार करतो. पहिल्या वर्षीचीच माती अजुनही वापरतोय. त्यात थोडीफार नवीन माती वापरतो. मूर्तीसाठी पोस्टर कलर्स, अॅक्रीलीक कलर्स, बॉडी कलरसाठी बाजारात मिळणारी रेडीमेड शेड, शाडू माती, हात, पाय, सोंड या अवयवांच्या आधारासाठी उदबत्तीच्या काड्या, दागिन्यांसाठी विविध माळा, खडे, चमकी - हे चिकटवण्यासाठी फेविबाँड, मंदिरात एक छोटासा एलईडी फोकस, असे साहित्य वापरले. यावर्षीच्या पर्यावरणपूरक सजावटीसाठीही पॅकिंगच्या खाकी खोके ( बॉक्स) चा वापर करून मंदिर तयार केले आहे.

या वस्तूंचा केला वापर

मंदिरासाठी 2 फूट x 2 फूट x2 फूट मापाच्या बॉक्सचा उपयोग केला आहे. त्यासाठी कापडी लेस, घंटी, ग्लू गन, फेविकॉल, काळा व गोल्डन स्प्रे पेंट बॉटल, वेलवेट कापड, खांबांसाठी कोरोगेटेड पेपर ( बॉक्सचे एका बाजुचे खाकी कव्हर काढलेले) यांचा वापर केला.

परंपरा जपल्याचा आनंद

यासाठी घरातील सर्वांचा सहभाग व उत्साह फार महत्वाचा लाभला. जास्त करून मुलगी व मुलाचा वाटा जास्त आहे. मी फक्त मुकूट व मंदिर करण्यासाठी हातभार लावला आहे.पुढील पिढीने ही परंपरा जपल्याचा फार आनंद होत आहे. तुम्हीही यापुढे असाच उपक्रम करावा, असा आग्रह आहे, असे प्रकाश बीडकर यांनी सांगितले.

पर्यावरणाला हानी नाही

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्त मूळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व गणेशमूर्तीची अवहेलना थांबवण्यासाठी प्रत्येकाने शाडू मातीच्या गणेशमूर्तीचा वापर करावा, असे आवाहन बीडकर यांनी केले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत मातीच्या बनवलेल्या मूर्ती पर्यावरणाला हानी पोहोचवत नाहीत. तसेच इको फ्रेंडली मूर्ती पाण्यामध्ये लवकर विरघळतात इको फ्रेंडली मूर्ती बनवण्यासाठी वापरणारे रंग हे कच्चे प्राकृतिक असतात. त्यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचत नाही. त्यामुळेच मातीपासून तयार केलेला गणपती बसवावे, असे बीडकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...