आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाझी वसुंधरा अभियानातंर्गत आकाश, जल, वायू, पृथ्वी, अग्नी या पंचतत्वावर केलेल्या कामाच्या मूल्यांकनात अकोले तालुक्यातील गणोरे ग्रामपंचायतीला राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे.
रविवारी नरिमन पॉईंट (मुंबई) येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गणोरे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष आंबरे, उपसरपंच प्रदीप भालेराव, ग्रामविकास अधिकारी एकनाथ ढाकणे यांनी पुरस्कार स्विकारला. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव म्हैसेकर, सदस्य विवेक आंबरे, सहायक गटविकास अधिकारी सचिन कोष्टी, छाया आहेर, कोमल आंबरे, एस. बी. सुपे, संजय बोराडे, रामदास आंबरे, दीपक काळे यावेळी उपस्थित होते.
राज्यातील १५ हजार ग्रामपंचायती माझी वसुंधरा अभियानात सहभागी होत्या. मार्च अखेर अभियान मोहिम यशस्वी राबवत पर्यावरणपूरक विकास कामे, लोकसहभाग, जलसंधारण सौर ऊर्जा, उज्वला गॅस, वृक्ष लागवड व संगोपन, हरित क्षेत्र वाढ, वसुंधरेची शपथ, लोक चळवळ, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे, घनकचरा व्यवस्थापन यामध्ये उल्लेखनीय काम करत ग्रामपंचायतीने पुरस्काराला गवसणी घातली. पुरस्काराबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार किरण लहामटे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, निखिलकुमार ओसवाल, गटविकास अधिकारी सोनकुसले, जि. प. सदस्य जालिंदर वाकचौरे, नामदेव आंबरे, प्रशांत जामोदे, उमेशचंद्र चिलबुले यांनी अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.