आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक:नेवाशातील लघुपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार, ‘ गण्याभाई : द किंग ऑफ व्हिलेज ’चे होतेय कौतूक

नेवासेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे येथील श्रीज्ञानेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या लघुपटाचे सध्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतूक होत आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या विकृतीचे वास्तव दाखवणाऱ्या गण्याभाई : द किंग ऑफ व्हिलेज या लघुपटाला दोन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

अनिल धनवटे या बीएमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन केले. गावातील इतर मित्रांच्या मदतीने या विषयावर भाष्य करण्यासाठी अनिलने सुरू केलेली ही धडपड खूप यशस्वी ठरत आहे. यासाठी त्याला रूट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट छायांकन तर इंडि शॉर्टस फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट पटकथा लेखन असे दोन पुरस्कार प्राप्त झाले. या लघुपटाच्या निर्मिती प्रक्रियेत श्रीज्ञानेश्वर महाविद्यालयातील यश संवाद विभागाचे प्रा. देविदास साळुंके यांनी विशेष मार्गदर्शन केले. मयूर वाघमारे, गणेश मोहिते, दीपक पारखे, प्रणव पवार, मनोज कांबळे, संभाजी धनवटे, मुन्ना खिलारे, सचिन मोहिते, अविनाश धनवटे, मनोज भालेराव, सुजित कापसे, रोहन शिर्के, सुरज कुसकर, बबलू शिरसाठ, अनिल वाघमारे या सर्व मुलांनी एकत्र येऊन हा लघुपट यशस्वी केला. गोष्ट सुचण्यापासून ती बनवण्यापर्यंत अनेक कष्ट करावे लागले. यादरम्यान बऱ्याच अडचणी आल्या. परंतु आई-वडील, भाऊ यांच्या पाठिंब्यामुळे प्रा. देविदास साळुंके व लेखक-दिग्दर्शक कृष्णा बेलगावकर यांनी घेतलेल्या कार्यशाळेमुळे आणि वेळोवळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन पुरस्कार मिळू शकले.

गण्याभाई : द किंग ऑफ व्हिलेज या लघुचित्रपटातून आम्ही समाजातलं एक भयाण वास्तव दाखवलं. काही विकृत घटकांमुळे नागरिकांना, मुलीं

बातम्या आणखी आहेत...