आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Garbage Controversy In The City Due To The Agitation Of Burudgaonkars! Garbage Depots Are Closed For The Second Day In A Row. Garbage Collection In The City Is Jammed | Marathi News

कचऱ्याचे ढीगचं ढीग:बुरुडगावकरांच्या आंदोलनामुळे शहरात कचराकोंडी! दुसऱ्या दिवशीही कचरा डेपो बंदच, शहरातील कचरा संकलन ठप्प, रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुरुडगाव कचरा डेपो परिसरातील रस्ते, पथदिवे व बुरुडगाव वासियांना नळाद्वारे पाणीपुरवठा आदी मागण्यांसाठी ग्रामस्थांनी सुरू केलेले आंदोलन दुसऱ्या दिवशी सुरू होते. मनपा अधिकारी व ग्रामस्थांमध्ये झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्यामुळे दुसऱ्या दिवशी कचरा डेपो बंद होता. परिणामी, शहरातील कचरा संकलन पूर्णपणे ठप्प झाले आहे.

महापालिकेचा बुरूडगाव येथील कचरा डेपो ग्रामस्थांनी टाळे ठोकून बंद केला आहे. यासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांनी मंगळवारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त शंकर गोरे, शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे, संजय शेंडगे यांनी बुरुडगाव येथे जाऊन तेथील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र जोपर्यंत प्रत्यक्षात कामे सुरू होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम राहिले. त्यामुळे कचरा डेपो बंदच ठेवण्यात आला होता. दुसरीकडे, या आंदोलनाचा परिणाम नगर शहरातील कचरा संकलनावर झाला आहे. डेपो बंद असल्यामुळे शहरातून संकलित केलेला कचरा वाहनांमध्ये तसाच पडून आहे. यामुळे बुधवारी शहरात कचरा संकलन ठप्प झाले होते. शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकला आहे. कचरा भरलेली वाहने जुन्या महापालिकेच्या आवारात तसेच प्रोफेसर कॉलनी येथील जागेत लावल्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी सुटली आहे.

बातम्या आणखी आहेत...