आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदल:नगरकरांना लवकरच पाइपलाइनमधून गॅस; ‘बीजीआरएल’कडून ग्राहकांच्या नोंदणीला सुरुवात, दररोज 24 तास अखंडीत गॅस पुरवठा

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये राबवण्यात आलेला पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याचा प्रकल्प आता नगर शहरातही राबवला जाणार आहे. भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड (बीजीआरएल) मार्फत हा प्रकल्प होत असून, गॅस धारकांच्या नोंदणीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. शहरात सुमारे ६१२ किमी लांबीची पाइपलाइन प्रस्तावित आहे. त्यातील पहिल्या टप्प्याच्या खोदाईचे कामही सुरू झाले आहे.

शहरात ६१२ किमी लांबीची पाइपलाइन प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात दोन प्रभागांत खोदाईसाठी महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. यात सुमारे ३८ किमीची पाइपलाइन टाकली जाणार आहे. ३७ किलोमीटर लांबीची खोदाई, तर दीड किलोमीटर ड्रिलिंग करुन पाइपलाइन टाकली जाणार आहे. शहरात टप्प्याटप्प्याने सर्व १७ प्रभागात गॅस पाइपलाइनचा प्रस्ताव आहे.

महापालिकेत कंपनीने सुमारे साडेआठ कोटी रुपये खोदाई शुल्क जमा केले आहे. खोदाईनंतर पाइपलाइन टाकून ग्राहकांना गॅसचे कनेक्शन दिले जाणार आहे. कंपनीच्या प्रतिनिधींमार्फत सावेडी उपनगरातील ग्राहकांशी संपर्क साधून नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात शहरात सर्वत्र पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...