आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:सीना नदीवरील पुलाचे काम मार्गी लावा; जगताप गडकरींकडे मागणी

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग नगर शहरातून जात आहे. या महामार्गावरील नालेगाव येथे सीना नदीवरील पूल दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जातो. या पुलाचे बांधकाम १९८४ साली झाले आहे. या बांधकामाला ३५ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. दुरावस्थेमुळे अपघात झाले आहेत. त्यामुळे नदीवर नव्याने पूल बांधावा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.

पावसाळ्यात हा पूल सातत्याने पाण्याखाली जातो. त्यामुळे १४ ते १८ तास वाहतूक ठप्प होते. पुलाला ३ मीटरचे प्रत्येकी १० गाळे आहेत. पुलाची एकूण लांबी ३० मीटर व रुंदी ७ मीटर आहे. या पुलामुळे विद्या कॉलनी, छत्रपती शिवाजी महाराज नगर आणि इतर रहिवासी भाग शहराला जोडले गेले आहे. हा पूल राष्ट्रीय महामार्गावर असूनही वाहतूकीसाठी पावसाळ्यात अनेकवेळा बंद ठेवावा लागतो.

त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होते. सदर पुलावर स्ट्रीट लाईटसह इतर सुविधा नसल्याने व पुलावर जागोजागी असलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालवताना अंदाज येत नाही. यामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. सदर पुलामुळे नागरिकांच्या आरोग्य व जीवीतास धोका निर्माण होत असल्याने नागरिकांची समस्या लक्षात घेऊन या राष्ट्रीय महामार्गावर नालेगाव येथे सीना नदीवर नवीन पुलाचे काम तातडीने मार्गी लावावे, असे निवेदनात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...