आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुण जगन्नाथ घनवट यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची गणित विषयातील पीएचडी संपादन केली आहे. त्यांनी ‘ए स्टडीऑफ सरटन इंटिग्रल ट्रान्सफॉर्मस अँन्ड देअर एक्टेंन्शन टू जनरलाईज्ड फंगशन्स’ या विषयावर जून २०२२ मध्ये पुणे विद्यापीठात प्रबंध सादर केला होता. त्यांना अहमदनगर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँन्ड सायन्स महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख डॉ. श्रीकिसन बी. गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळाले.
त्यांच्या विषयाचा वापर आयटी क्षेत्राशी निगडित असणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स इत्यादी विषयाचा अभ्यास करण्यासाठी करण्यात येतो. घनवट हे नेवासा येथील दिवंगत पत्रकार भाऊसाहेब पाठक यांचे जावई आहेत. पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल घनवट यांचे जेष्ठ नेते यशवंतराव गडाख, माजी मंत्री शंकरराव गडाख, मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख, महाविद्यालयाचे प्राचार्य गोरक्षनाथ कल्हापुरे, नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण, माजी विद्यार्थी संघ, प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.