आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. काही ग्रामपंचायतीत सरपंचपदाचा लिलाव करत कोट्यवधींची बोली लावण्यात आली. हा सरपंचपदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.
पत्रकात अण्णा हजारे म्हणाले, पंचायत राज मजबूत व्हावे, यासाठी ग्रामसभा व ग्रामपंचायतीचे स्थान सर्वोच्च आहे. ग्रामसभा ही गावची संसद असून ग्रामपंचायत सदस्य हे कार्यकारी मंडळ आहे. सरपंचपदाचा लिलाव झाला, तर लोकसभा व विधानसभा कमजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचारी, व्यभिचारी लोक त्या पवित्र मंदिरामध्ये जातील.
‘बिनविरोध’चे समर्थन
हजारे म्हणाले, गावातील सर्व मतदारांच्या संमतीने ग्रामसभेत सदस्यांची निवड करून निवडणूक बिनविरोध करणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे गावात मतभेद होत नाही. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका पार पडतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.