आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील झापवाडी महसुली गावच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या घोडेगाव बाजार क्षेत्राचा अहवाल जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी तहसीलदार नेवासे यांचेकडून मागीतला असल्याची माहिती सुधीर नाथा वैरागर यांनी दिली.
विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. झापवाडी हद्दीतील बाजार क्षेत्राचा घोडेगाव हद्दीत समावेश कामी झापवाडी ग्रामपंचायत ठराव, घोडेगाव ग्रामपंचायत ठराव, नेवासे तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ठराव, उपअधीक्षक भूमी अभिलेख नेवासे यांचेकडून घोडेगाव-झापवाडी या दोन्ही गावाची शिव निश्चिती नकाशा, घोडेगाव कामगार तलाठी यांच्याकडील सात बारा उतारे तसेच घोडेगाव-झापवाडी गाव विभाजन फेरफार व अभिलेख अधिकार आदी कागदपत्र अवश्यक आहेत. सुधीर नाथा वैरागर यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाचे १९९१ साली घोडेगाव-झापवाडी ग्रामपंचायत विभाजन प्रक्रियेमधे घोडेगाव बाजार क्षेत्राचा झापवाडी हद्दीत समावेश केल्याने घोडेगाव ग्रामपंचायतचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले असून घोडेगावच्या विकासवर गंभीर परिणाम होऊन ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे कोणतेही हक्काचे साधन राहीले नसल्याने बाजार क्षेत्र घोडेगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये समावेश करणे कामी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सुधीर वैरागर यांनी नमूद केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.