आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक:आशा सेविकांचे कोरोना काळातील योगदान समाज विसरणार नाही असे प्रतिपादन घुले यांनी केले

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळात दिलेल्या सेवेबद्दल आशा सेविका व गटप्रवर्तकांचा सन्मान

कामगारांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळालाच पाहिजे. आशा सेविकांनी मोठ्या धाडसाने गावातील वाडी-वस्तीवर जाऊन आरोग्य सेवा पोहचवली. पैशाला महत्त्व न देता, त्यांनी जीवावर उदार होऊन सेवाभावाने दिलेले योगदान समाज विसरणार नाही, असे प्रतिपादन हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.

आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटनेतर्फे कोरोना काळात दिलेल्या सेवेबद्दल आशा सेविका व गटप्रवर्तकांचा सन्मान करण्यात आला. मार्केटयार्ड येथील हमाल पंचायतच्या सभागृहात झालेल्या सन्मान सोहळ्यात घुले बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, आयटकचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, लाल बावटा कामगार संघटनेचे सतीश पवार, भाकपच्या सहसचिव कॉ. भारती न्यालपेल्ली, प्रकल्प अधिकारी सुनिल गोसावी, शेवगाव तालुकाध्यक्ष संजय नांगरे, आशा संघटनेच्या कार्याध्यक्षा सुवर्णा थोरात, सचिव मधुकर केकाण, गोविंद सांगळे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी केले. सुवर्णा थोरात यांनी संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून दखल घेऊन अशा सेविकांच्या मानधनात वाढ झाली. मात्र महागाईच्या काळात आशांना जीवन जगणे कठीण झाले आहे. हक्कासाठी कायद्याच्या चौकटीत राहून पुन्हा संघर्ष करावा लागणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सुनिल गोसावी यांनी, तर आभार कॉ. भारती न्यालपेल्ली यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...