आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:काकड आरतीला जाणाऱ्या मुलीवर अत्याचार; श्रीरामपूर तालुक्यातील घटना, आरोपीस अटक

श्रीरामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात दिवाळीसाठी आजोळी आलेल्या एक अल्पवयीन मुलगी काकड आरतीला गेली असता २२ वर्षीय युवकाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी दिवाळीनिमित्त आजोळी आली होती.

पहाटे पाच वाजता काकड आरतीला जात असताना गणेश बबनराव जगताप, वय २२ याने तिच्यावर अत्याचार केला आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी दोघांमध्ये इन्स्टाग्रामवर चॅटिंग झाले होते. मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...