आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:ताराबाई कन्या विद्यालयात मुलीच बनल्या शिक्षक; दोन विद्यार्थिंनींना सायकलचे वाटप

नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहरातील केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला .भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. मुलींमधून मुख्याध्यापिका प्राची साबळे हिने संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. त्यांना सुरेखा गरड आणि सखाराम गारुडकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व संस्था चालकांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

या दिनानिमित्त शालेय वर्गखोल्या बांधण्यासाठी काही देणग्या सर्व संस्थाचालकांनी दिल्या. तसेच सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींना याबाबत मदतीचे आवाहन केले. गरीब व होतकरू विद्यार्थिंनीना दोन सायकली देण्यात आल्या. यासाठी इयत्ता सातवीची क्रांती किशोर चव्हाण,इयत्ता- सहावीची वैभवी बंडू कोतकर या विद्यार्थिनींची निवड झाली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रमेश दळवी, सचिव बबनराव कोतकर, खजिनदार दगडू साळवे,सहसचिव रावसाहेब सातपुते, संचालक जयद्रथ खाकाळ, प्रल्हाद साठे, जाफर शेख, महेश गुंड, डॉ. सुभाष बागले आदी उपस्थित होते. प्राचार्य वासंती धुमाळ यांनी या दिनाचे महत्त्व विशद करून आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...