आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलींना स्वसंरक्षणाचे धडे, ही काळाची गरज बनली आहे. शाळेत विद्यार्थिनींना संस्कार, शिक्षण व स्वसंरक्षाणाचे धडे देऊन त्यांना स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर केले जात आहे. अंगावर आलेल्या दृष्ट प्रवृत्तीच्या हाताला निर्भयपणे रोखण्याचे काम मुली स्वसंरक्षणातून करतील, असा विश्वास संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी व्यक्त केला. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. स्वसंरक्षणतंर्गत मुलींना कराटे, ज्युदो, लाठी-काठीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
त्यावेळी त्या बाेलत हाेत्या. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह फिरोदिया व प्राचार्य उल्हास दुगड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडला. यावेळी प्रियदर्शनी रोटरी क्लबच्या अध्यक्षा निलमणी गांधी, सदस्या वैशाली कोलते, लता भगत, ज्योती गांधी, उपप्राचार्या सुषमा चिटमील, पर्यवेक्षक रावसाहेब बाबर, रवींद्र शिंदे, आशा सातपुते आदी उपस्थित होत्या. प्रास्ताविकात नीलमणी गांधी यांनी महिला व युवतींसाठी प्रियदर्शनी रोटरी क्लबच्या माध्यमातून सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. शाळेच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अंजली वल्लाकट्टी यांनी विविध प्रात्यक्षिके सादर करून मुलींना स्वतःचे संरक्षण करण्याचे धडे दिले. कोणताही कठीण प्रसंग आला तरी, प्रसंगावधान राखून स्वतः जवळ असणाऱ्या हत्याररुपी अवयवांचा कसा उपयोग करावा? हे प्रात्यक्षिकातून दाखवून दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.