आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंबाबोंब आंदोलन:बेघर कुटुंबांना तातडीने घरे द्या,  आदिवासी पारधी समाज संघटनेचा नगरपरिषद कार्यालयावर धडकला मोर्चा

श्रीगोंदेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे नगरपरिषद हद्दीत बायपासजवळ सुमारे तीस वर्षापासून राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या १४ व इतर ठिकाणी राहणारे २ अशा कुटुंबांचे रहिवासी अतिक्रमित कच्ची घरे पाडणाऱ्या मुख्याधिकारी मंगेश देवरे व प्रशासनाचा निषेध करत बेघर कुटुंबांना तातडीने घरे द्या, या मागणीसाठी आदिवासी पारधी समाज संघटनेचे अजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद कार्यालयावर बोंबाबोंब मोर्चा काढण्यात आला. यावेळी आदिवासी पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. बळे सर, बसपाचे सुनील ओहोळ, आरपीआयचे राजा जगताप, लोकशिक्षणचे प्रमोद काळे यांच्यासह अतिक्रमणधारक स्त्री-पुरुष मोठ्या प्रमाणावर आदी यावेळी उपस्थित होते. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देवरे यांच्या नियंत्रणाखाली तसेच महसूल व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने २५ ते २८ मे या कालावधीत शहरातील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यात आली. यात बायपासजवळ सुमारे तीस वर्षापासून राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या १४ व इतर ठिकाणी राहणारे २ अशा १६ कुटुंबांचे रहिवासी अतिक्रमित कच्ची घरे पाडण्यात आली. या कुटुंबातील काही कुटुंबप्रमुख नगरपरिषदेत सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. ज्यांची घरे उद्ध्वस्त झालीत त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून घरकुल मंजूर करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच राहत्या घराखालची जागेची नोंद करून तातडीने घरकुल मिळावे या मागणीसाठी आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली बेघर झालेल्या आदिवासी पारधी समाजाच्या वतीने बोंबाबोंब मोर्चा काढण्यात आला. न्याय न मिळाल्यास जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय आंदोलन छेडू : भोसले

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देवरे यांच्या नियंत्रणाखाली तसेच महसूल व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने २५ ते २८ मे या कालावधीत शहरातील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यात आली. यात बायपासजवळ सुमारे तीस वर्षापासून राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या १४ व इतर ठिकाणी राहणारे २ अशा १६ कुटुंबांचे रहिवासी अतिक्रमित कच्ची घरे पाडण्यात आली. या कुटुंबातील काही कुटुंबप्रमुख नगरपरिषदेत सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. ज्यांची घरे उद्ध्वस्त झालीत त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून घरकुल मंजूर करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच राहत्या घराखालची जागेची नोंद करून तातडीने घरकुल मिळावे या मागणीसाठी आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले यांच्या नेतृत्वाखाली बेघर झालेल्या आदिवासी पारधी समाजाच्या वतीने बोंबाबोंब मोर्चा काढण्यात आला. आदिवासी पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष काळे म्हणाले, उन, वारा, पाऊस याचा विचार न करता प्रशासनाने आदिवासी पारधी समाजाची घरे काढली. ज्या काळात माणूस माणसाच्या जवळही जात नव्हता. त्या कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींना अग्निदाह देण्याचे काम याच आदिवासी पारधी समाजाच्या सफाई कामगारांनी केले. असे असताना त्यांचे पुनर्वसन न करता त्यांची घरे पाडल्यामुळे पालिकेची दुटप्पी भूमिका दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने आमच्या मागण्या मान्य करून बेघरांना घरे द्यावी, अशी मागणी केली. जिल्हाध्यक्ष अजित भोसले म्हणाले, आज आम्ही तहसील कार्यालय ते श्रीगोंदे नगरपरिषद असा शांततेत काढलेला मोर्चा हा पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आणि आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आहे. मात्र जर आम्हाला येथे न्याय मिळाला नाही तर आम्ही भविष्यात जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय आंदोलन छेडणार आहोत. दरम्यान, नगरपरिषदेचे गटनेते मनोहर पोटे, मुख्याधिकारी देवरे, नगरसेवक आणि आदिवासी पारधी समाज संघटनेचे पदाधिकारी यांचे शिष्टमंडळ यांच्यात झालेल्या बैठकीत बेघर कुटुंबाना त्यांच्या सोयीनुसार घरे बांधून देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. या आंदोलनास यशस्वी करण्यासाठी सुकली चव्हाण, राहुल भोसले. आपल्या काळे, पहिल्या काळे, अमृत काळे, गुलाब काळे, धीरज भोसले, स्वप्नील पवार रामसिंग भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. १६ बेघर कुटुंबांना घरकुल मंजूर करून घरे बांधून देऊ

श्रीगोंदे नगरपरिषद हद्दीमध्ये दोन ठिकाणी जागा उपलब्ध आहेत. आदिवासी समाजाच्या संस्कृतीचा विचार करून बायपास येथील १४ व इतर ठिकाणी राहणारे २ अशा १६ बेघर कुटुंबाना घरकुल मंजूर करून घरे बांधून देण्यात येतील. तोपर्यंत त्यांना तात्पुरता निवारा करून देण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी यावेळी दिली. बोंबाबोंब आंदोलनात सहभागी झालेले पारधी समाज बांधव.

बातम्या आणखी आहेत...