आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात सततच्या पर्जन्यमानामुळे व अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतलेली खरीप पिके वाया गेली. महसूल व कृषी खात्याने पंचनामे करून ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवालही दिलेला आहे. याबाबत इतर जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे मात्र जिल्ह्याला कोणतीही नुकसान मिळालेली नाही. ती द्या अन्यथा न्यायालयात दाद मागू, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
याबाबत जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, हरिभाऊ तुवर, डॉ. नवले, युवराज जगताप, बच्चू मोढवे, नारायण टेकाळे, योगेश मोरे, त्रिंबक भातकरी, रणजीत सुल, गोविंद वाघ, सुदाम औताडे, शरद आसने, इंद्रभान चोरमल, कडू पवार, नारायण पवार, साहेबराव चोरमाल, अकबर शेख, शरद पवार, बबन उघडे, ज्ञानेश्वर आदिक, अशोक टेकाळे, वसंत वमने, मनोज औताडे यांनी प्रसिध्दीपत्रक काढले आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तालुक्यातील खरीप पिकाचे पंचनामे केले. शंभर टक्के खरीप पिकाचे ५० टक्केच्या पुढे नुकसान झाले. हे पंचनामे शासनास पाठवून दोन महिने उलटले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात एक दमडी आलेली नाही. दुसरीकडे जिल्ह्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. थकबाकी वसुली पोटी विज तोडणे कायद्याने गैर आहे. शेती ग्राहकाला वीज नियामक आयोगाने तोंडी सूचना देऊन वीज तोडली.
दहा महिन्यापूर्वी महाआघाडी सरकारच्या काळातही शेतकऱ्यांची वीज तोडली म्हणून पंढरपूर येथे तरुण शेतकऱ्यांच्या मुलांनी आत्महत्या केली. आजही अकोळनेर तालुका नगर येथील एम.ए. बीपीएड असलेल्या पोपट जाधव या शेतकऱ्यांने शेतीची वीज तोडली म्हणून आपली जीवनयात्रा संपवली. खरिपात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीत गेलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती कायद्याने हक्काची मदत न देता बेकायदेशीर विज बिल वसुली चालू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.