आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची द्या

राहुरी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजात चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यास अशा व्यक्तींच्या भविष्यातील कार्याला बळ मिळण्यास हातभार लागत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर यांनी केले.राहुरीतील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सुखदेव बलमे यांची मुंबई पोलिस सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती बाबा शेख यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर तसेच गोरक्षनाथ विटनोर यांची शिक्षक बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल राहुरी येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे म्हणाले, हा भूमीपुत्रांचा सत्कार असल्याने सत्कारास एक वेगळे महत्त्व आहे.निवड झालेल्या मान्यवरांच्या हातुन यापुढे देखील चांगले कार्य घडेल हा विश्वास जुंदारे यांनी व्यक्त केला. बलमे म्हणाले, बाचकर व नानासाहेब जुंधारे यांनी रासपाच्या माध्यमातून केलेला सत्कार हा भविष्यातील कामाला उर्जा देणारा ठरेल. या प्रसंगी बाळासाहेब गावडे, रंभाजी गावडे, उमेश बाचकर,मालुजी तिखुळे, विलास शेदोंरे प्रविण दाभाडे ,डोंगरे,भारत हापसे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...