आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोले तालुक्यात अवैध दारूविक्री व अनैतिक व्यवसायात प्रचंड वाढ झाली आहे. अकोले शहरात शाहूनगर येथून व अधिकृत दारूबंदी असलेल्या राजूर परिसरातून खुलेआम अवैध दारूविक्री होत असल्याचा आरोप दारूबंदी आंदोलनाचे निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी केला.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शासकीय गाजावाजा न करता, अकोल्याला ‘सरप्राईज व्हिजीट’ करण्याचे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांतील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात अकोले व राजूर पोलीस कुचकामी ठरले आहेत. अकोले शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे वाढले आहेत. विशेषत: बेकायदा दारूविक्री करणाऱ्यांवर पोलीस चांगलेच मेहरबान झाल्याचे दिसून येते.
पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी शहानिशा करण्यासाठी अकोल्यात व राजूर परिसराला अचानक भेट द्यावी. अवैध दारूची बोकाळलेली वस्तूस्थिती पाहावी, असे निमंत्रणच कुलकर्णी यांनी अधिक्षक ओला यांना निवेदन धाडून दिले आहे. संगमनेर येथील उत्पादनशुल्क विभाग व अकोले व राजूर पोलीसांच्या कृपादृष्टीने हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पोलीस प्रमुखांना हे पाहायला, यायला जमत नसेल, अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यात वेळ मिळालाच नाही, तर पुन्हा शाहूनगरमध्ये बेमुदत आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात नमूद केले आहे, की १५ ऑगस्ट २०२२ च्या आंदोलनानंतर बंद झालेली अवैध दारू पुन्हा शाहूनगर, कोतूळ, राजूर, देवठाण, समशेरपूर, गणोरे, लिंगदेव, चास, इंदोरी फाटा, वीरगाव फाटा येथून वाढली आहे. संगमनेर, ठाणगाव, आळेफाटा येथून अवैध दारूच्या चारचाकी गाड्या येतात, पण पोलीस व उत्पादन शुल्क ते थांबवत नाहीत. तालुक्यातील निंब्रळ, निळवंडे, इंदोरी व राजूरमध्ये खुलेआम दारूविक्री सुरू आहे.
राजूर व परिसरातील आदिवासीबहुल खडकी, पाडाळणे, शिसवद, रंधा, आंबित, वाकी बंगला येथे खुलेआम दारू विक्री सुरू असून, तेथील अवैध दारू विक्रेत्यांवर वारंवार गुन्हे दाखल करावेत. राजूर येथील अवैध दारू विक्रेत्यांकडून अकोल्यात कोल्हार-घोटी राज्यमार्गावर एक परवानाधारक परमीट रूम व बियर बार चालविण्यास घेतला आहे. येथील व्यवस्थापकाच्या पडद्याआड लाखोंची बनावट देशी-विदेशी दारूची विक्री होते.
राजूरमधील या सराईत विक्रेत्यास तडीपार करण्याची मागणी केली आहे. अवैध दारूविक्री ताबडतोब न थांबल्यास लवकरच वरील सर्व गावांतील गावकऱ्यांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कुलकर्णी यांनी दिला आहे.
रस्त्यावर खुलेआम होते दारुविक्री राजूर हे दारूबंदीचे गाव असतानाही हमरस्त्यावर खुलेआम अवैध विक्री होते. इंदोरी फाटा व वीरगाव फाट्यावर हमरस्त्यावरच हॉटेलमधून ही दारू दररोज तालुक्यातील इतर ठिकाणांना पोहोचवली जाते. इंदोरीचे हॉटेल व वीरगाव फाट्यावरील हॉटेल प्रशासनाने सील करावे. येथील सराईत गुन्हेगार तालुक्यातून तडीपार करावेत, अशीही मागणी निवेदनातून केली आहे.
रस्त्यावर खुलेआम होते दारुविक्री राजूर हे दारूबंदीचे गाव असतानाही हमरस्त्यावर खुलेआम अवैध विक्री होते. इंदोरी फाटा व वीरगाव फाट्यावर हमरस्त्यावरच हॉटेलमधून ही दारू दररोज तालुक्यातील इतर ठिकाणांना पोहोचवली जाते. इंदोरीचे हॉटेल व वीरगाव फाट्यावरील हॉटेल प्रशासनाने सील करावे. येथील सराईत गुन्हेगार तालुक्यातून तडीपार करावेत, अशीही मागणी निवेदनातून केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.