आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला बचत गट:दोन वर्षांनंतर कोपरगावात भरणार गोदाकाठ महोत्सव : पुष्पा काळे

कोपरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महिला बचत गट व छोट्या-मोठ्या उद्योजकांच्या उत्पादनाचे हक्काचे व्यासपीठ असलेला गोदाकाठ महोत्सव मागील दोन वर्षापासून जीवघेण्या कोरोनामुळे होवू शकला नाही. मात्र दोन वर्षानंतर पुन्हा एकदा शुक्रवारपासून( ६ जानेवारी) माजी आमदार अशोक काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोदाकाठ महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष पुष्पा काळे यांनी दिली.

मर मागील दोन वर्ष संपूर्ण विश्वावर आलेल्या जीवघेण्या कोरोना महामारीमुळे दोन वर्षापासून हा गोदाकाठ महोत्सव होवू शकला नाही. २०२२ च्या सुरुवातीपासूनच या महामारीला उतरती कळा लागून मागील काही महिन्यापासून कोरोना संक्रमण देखील थांबल्यामुळे ही महामारी नियंत्रणात आली आहे. त्यामुळे यावर्षी ६ ते ८ जानेवारी या चार दिवस गोदाकाठ महोत्सवाचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी दिली आहे.

बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ प्राप्त व्हावी व बचत गटाच्या मालाची जास्तीत जास्त विक्री होऊन बचत गटांच्या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात या उद्देशातून सुरु केलेल्या गोदाकाठ महोत्सवाची व्याप्ती वाढत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी( ६ जानेवारी) दुपारी ४ वाजता माजी आमदार अशोक काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पा काळे यांच्या हस्ते होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...