आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऐकता नगर केवडिया, गुजरात येथे १०ते ११ मार्च या कालावधीत झालेल्या २९ व्या इंडियन राउंड वरिष्ठ गट राष्ट्रीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना अहमदनगरची खेळाडू साक्षी एडके हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ५० मी.अंतरावरील स्पर्धेत ३२५ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. सांघिक कामगिरीत महाराष्ट्र संघाला कास्य पदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
आतापर्यंत साक्षी ने ४ राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन पदके पटकवली आहेत. अहमदनगर जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या अध्यक्ष डॉ. शुभांगी रोकडे, अभिजीत दळवी,धनंजय करंडे किशोर बेरड सचिन घावटे व पांडुरंग उदे यांचे प्रशिक्षण लाभत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.