आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहीरनामा:सदिच्छा, गुरूमाऊलीची सत्ता आम्हीच आणली होती ; जाहीर नाम्याप्रमाणे काम न झाल्याने गट निर्माण

नगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सदिच्छा व गुरूमाईलीची सत्ता आम्हीच आणली होती, त्यामुळे आम्ही पुन्हा सत्तेत जाणार आहोत. समविचारी संजय कळमकर, राजू शिंदे यांच्यासमवेतही आम्ही एकत्र काम केले आहे. त्यामुळे आम्ही आघाडीसाठी दारे खुली ठेवली असून सर्व समविचारी बरोबर आले तर दिशादर्शक भूमिका घेऊ, असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते आबासाहेब जगताप यांनी नगर येथील बैठकीनंतर स्पष्ट केले. जिल्हा शिक्षक बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, संघाची बैठक नगर येथील एका कार्यालयात झाली. यावेळी रावसाहेब सुंबे, कैलास चिंधे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सालके, महिला आघाडी अध्यक्ष संगीता कुरकुटे, किसन बोरूडे, रघुनाथ झावरे, गजानन जाधव, माजी चेअरमन चांगदेव ढेपले आदी उपस्थित होते. बैठकीनंतर जगताप म्हणाले, आघाडीसाठी दारे खुली ठेवली आहेत. सदिच्छा मंडळ तसेच गुरूमाऊली मंडळाची सत्ता आम्हीच आणली होती. पण जाहीर नाम्याप्रमाणे काम न झाल्याने गट निर्माण झाले. समविचारी कळमकर, राजू शिंदे यांच्यासमवेत एकत्र काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...