आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:गावठी दारूसह 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

१ लाख १५ हजार रुपयांची तयार गावठी दारू तसेच ८५ हजार रुपयांचे गावठी दारूचे रसायन असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल राहुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन नष्ट केला. दरम्यान, नगर-मनमाड राज्य महामार्गालगतच्या धामोरी फाटा भागात मोठ्या प्रमाणात दारूची निर्मिती होत असताना राहुरी पोलिसांना आजवर साधी भणक लागली नाही? असा सवाल उपस्थित हाेत आहेे. तालुक्यातील धामोरी फाटा येथे बुधवारी सायंकाळी राहुरी पोलिसांनी दारूच्या दोन गुत्त्यावर ही कारवाई केली. राकेश ओला यांनी जिल्हा पोलिस प्रमुख पदभार घेतल्यानंतर अवैध दारू धंद्यावर कारवाईचे नुकतेच आदेश दिले.

पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नाऱ्हेडा, काॅन्स्टेबल टेमकर, दिवटे, राठोड, बडे, कोहकडे या पोलिस पथकाने धामोरी येथे जावून १ लाख १५ हजारांची तयार दारू व ८५ हजार रुपयांचे दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन असा मुद्देमाल जप्त केला. पोलिसाच्या फिर्यादीवरून रंभाबाई गिऱ्हे व राजेंद्र गिऱ्हे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलिस काॅन्सटेबल टेमकर करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...