आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षीनिरीक्षण:बिनभिंतींच्या शाळेतील गुरुंच्या सहवासात भरला वर्ग, गोपाळवाडी जि. प. प्राथमिक शाळेचा उपक्रम

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेगळे पक्षी पाहून चिमुकले भारावले

निसर्ग आणि निसर्गातील विविध पशु पक्षी हे आपले गुरू. एकाच लक्ष्यावर व भक्ष्यावर लक्ष केंद्रित करा असं शिक्षण टिटवी आपल्याला देते तर, उंच आकाशात विहरत असतांनाही आपल्या घरट्यावरच लक्ष उडू देऊ नका हे घार सांगते. सुगरण आपल्याला वास्तू कलेतील तीच प्राविण्य दाखवताना आपल्याला आव्हान देत असते तर, सुतार पक्षी आपल्या चोचिची कमाल झाडाच्या ढोली ढोलीत उमटवत असतो. अश्या या बिनभिंतीच्या शाळेतील लाखो गुरूंच्या सहवासात राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्ग भरला. निमित्त होते जिल्हा निसर्गप्रेमी संघटना व जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पक्षीनिरीक्षण व पक्षीगणना उपक्रमाचे. चिमणी, कावळा, कबुतर या नेहमी दिसणाऱ्या पक्षांबरोबरच सकाळच्या वेळी पाणथळ किंवा विहिरीच्या परिसरात विद्यार्थ्यांना मैना, भारद्वाज, सातभाई, सुतार, कोकीळ, कोतवाल, बगळा या सारख्या काही पक्षांचे ही दर्शन झाले. विहिरीत लटकणारे सुगरणीचे खोपे, गोल गोल फिरत अचानक सूर मारणारी टिटवी, रंगीबेरंगी खंड्या असे काही वेगळे पक्षी पाहून आमचे चिमुकले भारावून गेले.

आपल्या परिसराची माहिती, पर्यावरणाविषयी जाणीव जागृती आणि पर्यावरण संवर्धनात आपला ही सहभाग व्हावा या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोणता पक्षी आहे, त्यांची साधारण संख्या किती हे मुलं निरीक्षणातून टिपत होते. हे सगळं पाहत असतांनाच परिसरातील झाडे, वनस्पती, पिके यांची माहिती, पानांचे प्रकार, जनावरांचा चारा, पक्षांचा किलबिलाट, प्राण्यांचा आवाज याच ही कुतूहलाने आस्वाद घेत होते. नियमित पक्षांबरोबरच साळुंकी, सातभाई, खंड्या, मैना, पोपट, शिंपी, सुतार, रॉबिन, घुबड, कोतवाल, घार, बगळा, सुगरणीचा खोपा व नाविन्यपूर्ण पक्षी आणि त्यांच्या सवयी पाहून चिमुकले हरखून गेले. आपल्या आजूबाजूच्या परिसराचे, परिसरातील प्राणी, पक्षी, त्यांचे आवाज यांचे निरीक्षण आणि श्रवण केले पाहिजे, त्यांचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे तरच आपल्या पर्यावरणाचे रक्षण शक्य आहे, असे उपक्रमाचे आयोजन करणारे शिक्षक नारायण मंगलारम म्हणाले. जयराम सातपुते यांच्या प्रेरणेतून राबवले जाणारे २०२२ हे नगर जिल्ह्यातील पक्षी गणनेचे तेरावे तर गोपाळवाडी शाळेतील तिसरे वर्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...