आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासकामे:खारे कर्जुनेत शेतकऱ्यांना गोठा काँक्रीटीकरण अनुदान ; शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास दिले प्राधान्य

नगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर तालुका पंचायत समितीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना गोठा काँक्रीटीकरण, शेळी निवारा बांधणे यासाठी मंजुरी आदेश, खारेकर्जुने येथील शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले असल्याची माहिती पंचायत समिती माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी दिली. त्यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या या प्रकरणांच्या मंजुरी आदेशांचे वितरण नुकतेच करण्यात आले. सन २०२१ मध्ये खारेकर्जुने या गावात आठ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. त्यामध्ये प्रत्येकी ३६ हजार रुपये अनुदान देण्यात आले. तसेच याच वर्षात एक विहिर देण्यात आली. त्यासाठी २ लाख ८० हजार देण्यात आले. सन २०२२ मध्ये एक विहिर व सहा गोठा काँक्रीटीकरण प्रस्ताव मंजूर केले. त्यामध्ये गोठा काँक्रीटीकरणसाठी प्रत्येकी ७७ हजार रुपये मंजुरी देण्यात आली आहे. विहिरीसाठी ३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यावेळी यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, कैलास लांडे, सबाजी पानसंबळ, सहदेव लांडे, रशीद सय्यद व इतर मान्यवर शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...