आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सव:स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत शासकीय इमारती विद्युत रोषणाईने उजळणार

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत'नगर शहरातील सर्व शासकीय इमारतींवर १३ ,१४ व १५ ऑगस्टला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली. याबाबतचे निर्देश निचित यांनी सोमवारी सर्व विभागांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी निचित यांच्या उपस्थितीत लोकशाही दिन व "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' तयारीची आढावा बैठक झाली.अपर जिल्हाधिकारी यमाजी यमगर यांच्यासह विविध शासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते. निचित म्हणाले, स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सवांतर्गत १३ ऑगस्‍ट ते १५ ऑगस्‍ट दरम्‍यान "हर घर तिरंगा" या उपक्रमांतर्गत सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी घरोघरी तसेच कार्यालयामध्ये तिरंगा लावावा. या उपक्रमासाठी सर्वांनी सूक्ष्म नियोजन करून उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन त्यांनी केले. नगर शहरासह जिल्ह्यातील विविध शासकीय इमारतींना "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत'१३ ,१४ व १५ ऑगस्टला विद्युत रोषणाई करावी, असे निर्देश निचित यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...