आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहभाग:मतदार जागृती अभियानात शासकीय विभागांनी सहभाग नोंदवावा : निकम

संगमनेर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मतदारांमध्ये मतदान व निवडणुकांविषयी जनजागृती वाढावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदारांचे शिक्षण व निवडणूक सहभाग (स्वीप) हा पथदर्शी उपक्रम हाती घेतला आहे. संगमनेर मतदार संघात उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात निवडणूक शाखेमार्फत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तालुकस्तरीय स्वीप कमिटीची बैठक तहसीलदार कार्यालयात पार पडली. यावेळी निकम त्यांनी स्वीप अंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या निवडणूक व मतदार जनजागृती कामकाजाचा आढावा घेत मतदार जागृती मंच स्थापन करणे.

नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणे. शाळा, महाविद्यालय, ग्राम पातळीवर चुनाव पाठशालांचे आयोजन करणे. तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करणे. राष्ट्रीय मतदार दिन, महिला दिन, अपंग दिन, तृतीयपंथी दिन कार्यक्रमांसाठी पूर्व तयारी करणे आदी विषयी अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. तालुक्यातील स्वीपचे नोडल अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, माध्यमिक शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांची बैठक घेऊन उपक्रमाची माहिती दिली. याकामी मतदार मदत केंद्र स्थापन करण्यात आले अाहे. निवडणूक नायब तहसीलदार विनोद गिरी, महसूल सहायक सतीश बगाड कामकाज पाहणार असल्याचे निकम यांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...