आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वातून संगमनेर तालुका टँकरमुक्तीकडे वाटचाल करीत आहे. जलजीवन मिशनतंर्गत तालुक्यातील जवळपास ३३ गावच्या पाणी योजनेसाठी आत्तापर्यंत ३७७ कोटी रुपयांची शासकीय तरतूद करण्यात आली. यामुळे पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या गावांचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागणार आहे.
तालुक्यातील चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा, आनंदवाडी, गणेशवाडी या ५ गावासाठी जलजीवन मिशनतंर्गत गुरुवारी ५९ कोटी ९७ लाख १६ हजार रुपयांच्या पाणी योजनेला मान्यता मिळाली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजित थोरात यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील पठारभाग व तळेगाव या दुष्काळी पट्ट्यातील जटील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मोठा निधी उपलब्ध केला जात आहे. २०१५ ते २०१९ मध्ये संगमनेर तालुक्याला पावसाअभावी मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाला पराकाष्ठा करावी लागली.
जवळपास ७५ टक्के गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. वाढत्या उन्हामुळे उशिरा का होईना, पण सध्या पठारभाग व तळेगाव पट्ट्यात पाण्याच्या टँकरची मागणी वाढली. पाणी योजनेच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे. यासाठी वाड्या-वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. पाण्याच्या प्रश्नासह रस्ते व विजेचे जाळे तालुक्यात विणले जात आहे. मंत्री थोरात यांनी कोरोना नंतर तालुक्यातील विकासकामांना अधिक गती दिल्याने संगमनेरकरांनी आभार व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.