आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये

राहाता7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतीच्या पावसामुळे उद्ध्वस्त पिकांना तुटपुंजी मदत करण्या ऐवजी भरीव अनुदान द्यावे नुकसानी प्रमाणे संपूर्ण विमा भरपाई देण्याकरिता विमा कंपन्यांना आदेशित करावे तसेच अतिवृष्टी ग्रस्तांना हेक्टरी ४० हजार रुपये मदत देऊन शेतकऱ्यांना या आर्थिक आधार द्यावा सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. अन्यथा या विरोधात शेतकरी बांधवांसमवेत किसान सभेला आवाज उठवावा लागेल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉम्रेड प्रा. एल. एम. डांगे यांनी दिला आहे.

प्रसिद्धी पत्रकात प्रा. डांगे यांनी म्हटले आहे की, निसर्गाचा लहरीपणा वाढत आहे. शेतकऱ्याचे कष्ट वाया जात आहे अतिवृष्टीने खरिपातील हाता तोंडाशी आलेले पीक सुद्धा शेतकऱ्यांचे वाया गेले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उरल्या सुरल्या शेतमालाचे बाजार भाव सुद्धा पडलेले आहेत अशा परिस्थितीत नुकसान भरपाई म्हणून अगदी नगण्य व तुटपुंजी मदत मिळते हे अत्यंत चुकीचे असून शेतकऱ्याला आर्थिक संकटातून खऱ्या अर्थाने दिलासा देण्यासाठी तातडीने विमा कंपनीने संपूर्ण विमा भरपाई द्यावी व मोठे अनुदान देऊन शेतकरी बांधवांना शासनाने सहकार्य करावे अतिवृष्टीने संकटात सापडल्याने अनेक प्रश्नांनी शेतकरी पिचलेला आहे दररोज नवनवीन संकटाचा सामना शेतकरी बांधवास करावा लागत आहे सरकारने आता शेतकऱ्यांचा आता अंत पाहू नये लागलीच योग्य ती मदत करून जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला या संकटातून बाहेर काढावे अन्यथा शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्यां सरकार अथवा व्यवस्थेच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभा राज्यभर आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही.

निसर्गाचा ढासळलेला समतोल शेतकऱ्यांच्या पाटीलाच पुजला आहे कधी निसर्गाचा लहरीपणा कधी अतिवृष्टी तर शेतीमालाचे सतत पडणारे बाजार भाव यामुळे खर्च आणि उत्पादक शेतमाल याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांना एका मागून एक येणाऱ्या संकटाचा मोठा सामना करावा लागत आहे सरकारने कायमस्वरूपी हमीभावाचा कायदा करून शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे शेतीसाठी स्वतंत्र बजेट मांडण्यात यावे, आदी मागण्या प्रा. डांगे यांनी केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...