आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:राज्यपाल कोश्यारी व त्रिवेदी यांचा बेलापूरमध्ये निषेध

श्रीरामपूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा बेलापूर येथे जाहीर निषेध करण्यात आला. असे वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोशारी आणि प्रवक्ते हिमांशू त्रिवेदी यांना पदावरून हटवून महाराष्ट्राची अस्मिता कायम राखावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. विजयस्तंभ चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी बेलापूर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले, शिवसेनेचे शहराध्यक्ष अशोक पवार, देवदास देसाई, चंद्रकांत नाईक, दत्तात्रय कुऱ्हे, रफीक शेख, ज्ञानदेव वाबळे, प्रकाश कुऱ्हे, सुधाकर खंडागळे, लहानु नागले, अक्षय नाईक, वैभव कुऱ्हे, शोएब शेख, सुल्तान शेख, गौरव सिकचि, अय्याज सय्यद, शशिकांत कापसे, विजय दुशिंग, राजेंद्र भांड, सागर भांड, अनिल नवले, माणिक नेहे अकील बागवान, मोहन दरक, ऋषिकेश नाईक, विजय शेलार, सुरेश जाधव, जालिंदर गाढे आदी उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज हे कोणी एका जाती-धर्माचे नव्हते. अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन त्यांनी स्वराज्याचा राज्यकारभार चालवला. सर्वांना बरोबर घेऊन चालणारे व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्र महाराजांकडे पाहतो. त्यांनी कधीही धर्मभेद, जातीभेद केला नाही. एक प्रजाहितदक्ष राजा म्हणून शिवाजी महाराजांचा उल्लेख केला जातो. सर्व जाती धर्मातील माता भगिनींचा सन्मान करून त्यांना संरक्षण देणारा राजा म्हणून त्यांचे कडे पाहिले जाते. एक जाणता राजा म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. मात्र काही अज्ञानी लोक त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतात.हा केवळ छत्रपतींचा अपमान नसून महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे भाजपने केवळ
बातम्या आणखी आहेत...