आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्षिस:गोविंदा रे गोपाळा : डीजेवर थिरकली तरुणाई, 7 लाखांची बक्षिसे

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहर व उपनगर परिसरात १५ प्रमुख मंडळे व संघटनांसह अनेक छोट्या मंडळांकडून दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. संगीताच्या तालावर नगर जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील गोविंदांच्या पथकांनी सहभाग नोंदवला. अनेक ठिकाणी सिने अभिनेत्रींच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्यात आला. गोविंदांच्या पथकांना ६ लाख ८७ हजार ६६५ रुपयांची बक्षीसे आयोजकांकडून देण्यात आली.

सावेडी उपनगर व शहर परिसरात गंगा उद्यान येथे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांचे अजिंक्य युवा प्रतिष्ठान, पद्मावती चौकात विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांचे संघर्ष युवा प्रतिष्ठान, नेप्ती नाका येथे भूमिपुत्र संघटना, राधाकृष्ण मंदिर सर्जेपुरा येथे इंगळे प्रतिष्ठान, कोंड्यामामा चौक येथे वर्चस्व ग्रुप, दिल्ली गेट प्रतिष्ठान, प्रोफेसर चौक मित्र मंडळ, दाळ मंडई येथे भारत सरकार मित्र मंडळ, इंपिरियल चौकात आमदार संग्राम जगताप प्रणित प्रेरणा प्रतिष्ठान, केडगाव देवी येथे शिवमुद्रा प्रतिष्ठान, रंगारगल्ली येथे राधाकृष्ण मित्र मंडळ, मिरावली दर्गा चितळे रोड येथे महाकाल ग्रुप, चौपाटी कारंजा येथे चंद्रशेखर आझाद मित्र मंडळ आदी संघटनांकडून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. नगर जिल्ह्यासह जिल्हा बाहेरील गोविंदांच्या पथकांनी १५ ते २० फूट उंचीवर असलेल्या दहीहंड्या चार ते पाच थर रचून फोडल्या.

सिने अभिनेत्री प्राची देसाई, चित्रगंधा सिंग, धनश्री काडगावकर, जुई शेरकर यांच्या उपस्थितीत शहर व सावेडी उपनगरात उत्सव साजरा झाला. अभिनेत्रींच्या उपस्थितीमुळे युवकांसह नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. डीजेसह ढोल ताशांच्या तालावर तरुणाई जल्लोष करत होती दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कोतवाली व तोफखाना पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.

प्रमुख मंडळांची बक्षीसे
प्रेरणा प्रतिष्ठान : १ लाख ११ हजार १११
वर्चस्व ग्रुप : १ लाख ११ हजार १११
अजिंक्य युवा प्रतिष्ठान : १ लाख ११ हजार १११
संघर्ष युवा प्रतिष्ठान : १ लाख ११ हजार १११
जगदंबा ग्रूप : १ लाख ११ हजार १११
महाकाल ग्रुप : ५५ हजार ५५५
भूमिपुत्र संघटना : ५५ हजार ५५५
प्रोफेसर कॉलनी : २१ हजार

बातम्या आणखी आहेत...