आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या पिढीतील वारकरी:गोविंदराव सखाराम दळवी

अकाेले25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेले तालुक्यातील आढळा खोऱ्यातील जुन्या पिढीतील वारकरी सांप्रदायिक व आपल्या शेतात विविध प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी गोविंदराव सखाराम दळवी (वय ८३) यांचे बुधवारी (२८ डिसेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी विडी कामगार म्हणून काम करत आपल्या काळ्याआईची सेवा केली. टोमॅटो, कांदा पिके घेऊन परिसरातून दिशादर्शक ठरत उत्पादनाचा उच्चांक केला.

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची स्थापना करुन संचालक व अध्यक्ष म्हणून कौतुकास्पद जबाबदारी सांभाळत नेत्रदीपक यश मिळवून संस्था भरभराटीला आणली. अकोल्यात १९९७ मधे कांदा बारदान विक्री व्यवसाय सुरू केला. त्यांच्या मागे पत्नी, मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. ते जिल्हा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष व संगमनेर व अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा खरेदीदार रावसाहेब उर्फ लालूशेठ दळवी व सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब दळवी यांचे वडील, तर कांदा व्यवसायिक नरेंद्र दळवी यांचे आजोबा होत.

बातम्या आणखी आहेत...