आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीना नदीचे सुमारे ़१३ किमीचे पात्र नगर शहरातून जाते. त्यात सांडपाणी व मैलमिश्रित पाणी सोडल्यामुळे पात्र प्रदूषित झाले आहे. आता अमृत भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून हे पाणी पाइपद्वारे वाकोडी परिसरातील शुद्धीकरण केंद्रावर जाणार आहे. त्यामुळे सीना नदी प्रदूषणमुक्त होईल. तिच्या सुशोभीकरण कामाच्या निधीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. अमृत पाणी योजनेचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. नगर शहर टँकर मुक्त करू, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून कल्याण रोड हॅप्पी थॉट्स परिसरातील बंद पाईप गटार योजना कामाचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी प्रा.खासेराव शितोळे, युवराज शिंदे, भगवान काटे, पारुनाथ ढोकळे, अभय शेंडगे, ललित सांगळे, डॉ.अच्युत घुमरे, अमर गोंधळे, लक्ष्मण खोडदे, दादा आरवडे, हिरामण गुंड, पांडुरंग देवकर, दत्तात्रय कर्डिले, संतोष ढगे, अमोल भागवत, संदीप सोनवणे, संपत हिंगे, रोहित काळोखे आदी उपस्थित होते युवराज शिंदे म्हणाले, कल्याण रोड परिसराचा रखडलेल्या विकासाला आमदार जगताप यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने विविध विकास कामे सुरु आहे. पारुनाथ ढोकळे म्हणाले, आमदार जगताप यांच्या प्रयत्नातून कल्याण रोड परिसर हा भविष्यात स्वच्छ सुंदर विकसित उपनगर म्हणून ओळखले जाईल. सर्वांना सोबत घेवून विकासाची कामे मार्गी लावत आहे. कल्याण रोड परिसरात उद्यानाची निर्मिती करावी, याचबरोबर फेज २ पाणी योजना सुरु करावी. तसेच टप्प्याटप्प्याने रस्त्याची कामे लवकरात लवकर हाती घ्यावी. अशी मागणी करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.