आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:पदवीधरांनी मतदार म्हणून त्वरित नोंदणी करावी

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त रमेश काळे यांनी गुरुवारी राहाता तहसील कार्यालयाला भेट दिली. पदवीधर मतदार संघाच्या पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

यावेळी राहाता तहसीलदार कुंदन हिरे, मंडळाधिकारी डॉ.मोहसीन शेख व तालुक्यातील इतर सहा पदनिर्देशीत अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री.काळे यांनी पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रमाबरोबर डाटा एन्ट्री कामकाजाचा आढावा ही घेतला. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार १ नोव्हेंबर २०२२ च्या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यासाठी पदवीधरांना मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी ७ नोव्हेंबर ही शेवटची मुदत आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदार संघात ‘मतदार’ म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी आता ऑनलाईन सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाच्या अधिकृत लिंकद्वारेच पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. पदवीधर मतदार नावनोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नमूना १८ भरून मंडळस्तरावर अथवा तहसील कार्यालयात (निवडणूक शाखा) येथे जमा करू शकतात अथवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकृत लिंकद्वारे https://ceoelection.maharashtra.gov.in/graduate अर्ज दाखल करू शकतात. गुगल अथवा इतर लिंकद्वारे मतदारांनी नमूना-१८ भरल्यास असा अर्ज हा अधिकृत नाही. त्यामुळे शासकीय लिंक वगळता इतर लिंकस् द्वारे भरलेला ऑनलाईन अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. अशा नमूना-१८ ची तहसील स्तरावर डाटा एन्ट्री केली जात नाही. पदवीधर मतदारांनी निवडणूक आयोगाच्या अधिकृत लिंकद्वारेच नमूना-१८ भरावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बातम्या आणखी आहेत...