आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमदार बबनराव पाचपुते, नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा परिषदेची माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, शहाजी हिरवे सचिन जगताप या दिग्गज नेत्यांच्या गावांसह १० ग्रामपंचायत निवडणूक १८ डिसेंबर रोजी होणार आहे सरपंचपद जनतेतून असल्याने अनेकांनी सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे या निवडणुकीनिमित्त दिग्गजांच्या गावात प्रतिष्ठा आणि अस्तित्व पणाला लागणार आहे
आमदार पाचपुते यांचे काष्टीचे सरपंच पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे. सदस्यपदासाठी अनेक इच्छुक आहेत. बबनराव पाचपुते विरोधकांना बरोबर घेऊन निवडणूक बिनविरोध करतात की पाचपुते नागवडे समोरासमोर भिडतात का माजी आमदार राहुल जगताप यांचा गट आव्हान देणार हे महत्वाचे सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी कुणबी कार्डची चलती राहणार आहे.
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांचे बेलवंडीचे सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे सरपंच पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे त्यामुळे उमेदवारी कुणाला द्यावी यावर आण्णासाहेब शेलार यांचेपुढे धर्मसंकट आहे मागील निवडणूक शेलारांचे बहुमत झाले मात्र सरपंचपदी विरोधी गटाच्या सुप्रिया पवार यांची वर्णी लागली होती त्यामुळे शेलारांची अग्निपरीक्षा निश्चित आहे
माजी जिल्हा परिषद सदस्य सचीन जगताप यांचे बनपिपरी गावचे सरपंच पद ओबीसी व्यक्ती साठी आरक्षित त्यामुळे कुणबी कार्ड ची हवा राहणार सचीन जगताप यांनी योग्य उमेदवार न दिलास विरोधी गटाने जगताप यांच्या राजकारणाला सुरुंग लावण्याची युव्हरचना आखली आहे.
घोगरगावचे सरपंचपद अनुजाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे विद्यमान सरपंच बाळासाहेब उगले व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस एकत्रीत निर्णय घेतात की समर्थक प्रतिष्ठेसाठी समोरासमोर लढतात यावर उत्सुकता आहे.
देवा शेळके यांचे थिटे सांगवीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे त्यामुळे दिग्गजांना सौभाग्यवती चे कार्ड वापरावे लागणार आहे. तांदळी दुमाला गावचे सरपंच पद सर्वसाधारण व्यक्ती साठी खुले आहे त्यामुळे इच्छुकांची संख्या डझनभर झाली आहे.
माठमध्ये आरक्षणामुळे अनेकांचा हिरमोड
पारगाव सुद्रिकचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहेत. शहाजी हिरवे बाळासाहेब जगताप आणि माऊली हिरवे शिवाजी जगताप यांचे पॅनल समोरासमोर भिडणार आहेत. माठमध्ये सरपंचपदाचे आरक्षण अनुजमाती व्यक्तीसाठी आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा निघून गेली आहे. तरडगव्हाण मध्ये ओबीसी महिला तर चवर सांगवीत सर्वसाधारण महिलेसाठी सरपंचपद आरक्षित आहे. याठिकाणी नेहमीप्रमाणे राजकारण होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.