आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्ह्यातील 195 गावांसाठी रविवारी (18 डिसेंबर) ला शांततेत मतदान झाले. या ग्रामपंचायतींसाठी 81. 72 टक्के मतदान झाले असून,4 लाख 61 हजार 381 मतदारांपैकी 3 लाख 77 हजार 463 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दरम्यान जिल्ह्यातील बहुतांशी मतदार केंद्रांवर दुपारी मतदार करण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती.सायंकाळी मात्र गर्दी काही प्रमाणात ओसरली होती. दरम्यान रविवारी लग्नाची दाट तिथी असताना देखील ग्रामीण भागात मतदानासाठी उत्साह असल्याचा दिसून आला.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 9 नोव्हेंबरला आचारसंहिता जारी झाली होती. शुक्रवार 16 डिसेंबरला या निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, त्यातील 8 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 195 गावांमध्ये रविवारी मतदान झाले. ग्रामीण स्तरावर गेल्या पंधरा दिवसापासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उडत होता.
रविवारी 195 गावांमध्ये सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातील संगमनेर मध्ये सर्वाधिक 37 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत्या.
नगर जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायतींसाठी 766 मतदान केंद्रावर 81. 72 टक्के मतदान झाले. या ग्रामपंचायतींसाठी एकूण 4 लाख 61 हजार 381 मतदारांपैकी 3 लाख 77 हजार 463 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 1 लाख 97 हजार 619 पुरुष मतदार तर 1 लाख 79 हजार 815 महिला मतदारांनी मतदान केले.
दुपारी बहुतांशी मतदार केंद्रावर गर्दी, सायंकाळी मात्र गर्दी ओसरली होती.दाट लग्न तिथी असतानाही ग्रामीण भागात मतदानासाठी उत्साह दिसून आला.पाथर्डी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोरडगाव ग्रामपंचायतचे रविवारी शांततेत मतदान पार पडले. कोरडगाव येथे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या.
दिग्गज नेत्यांची ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिष्ठापणाला
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे गणित समोर ठेवून ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात दिग्गज नेत्यांनी घराणेशाहीचा राजकीय वारसा कायम ठेवण्यासाठी घरातूनच उमेदवाऱ्या देत प्रतिष्ठापणाला लावली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत ही श्रीगोंदे तालुक्यातील काष्टीत होणार आहे. काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुत्र प्रतापसिंह पाचपुते यांच्या विरोधात घरातूनच त्यांचे बंधू सदाशिव पाचपुते यांचे पुत्र साजन पाचपुते रिंगणात उतरले आहेत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.