आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:ग्रामपंचायत सदस्याकडून सरकारी कामात अडथळा, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक काम करत असताना ग्रामपंचायत सदस्याने त्यांच्या कामात अडथळा निर्माण केला. कामाच्या फाईली फाडून ग्रामसेवकास ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घेतल्याची घटना खोसपुरी (ता. नगर) येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामसेवक राहुल नामदेव गांगर्डे (वय ३४ रा. इमामपूर ता. नगर) यांनी फिर्याद दिली. आरोपीमध्ये ग्रामपंचायत सदस्य आसाराम लक्ष्मण वाघमोडे (रा. खोसपुरी) व त्याच्या सोबतच्या अनोळखी चार व्यक्तींचा समावेश आहे. गांगर्डे हे दहा वर्षांपासून इमामपूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे खोसपुरी व धनगरवाडीचा अतिरिक्त पदभार आहे. मंगळवारी (१५ मार्च) दुपारी साडेबाराच्या सुमारास ग्रामसेवक गांगर्डे ग्रामपंचायतमध्ये वसुली, दाखले व उतारे याचे काम करत होते. त्यावेळी ग्रामपंचायत शिपाई संजय नामदेव गायकवाड, राहुल जगन्नाथ चव्हाण हे देखील तेथे होते. त्यावेळी तेथे गावातील अदिनाथ गोरक्षनाथ नागरगोजे तसेच जगन्नाथ खंडु पिसाळे हे घरकुल मंजुरीचे कागदपत्रे देण्यासाठी आले होते. यावेळी सदस्य वाघमोडे कार्यालयात आले व गांगर्डे यांना म्हणाले, तू माझा फोन का उचलत नाही, तू ग्रामपंचायत कार्यालयात काय चाललेय, असे म्हणत सरकारी रजिस्टर व फाईलमधील पाने फाडून फेकून दिली. त्यानंतर वाघमोडे याने त्याच्या सोबतच्या चौघांच्या मदतीने ग्रामसेवक गांगर्डे यांच्यासह संजय गायकवाड, अदिनाथ नागरगोजे तसेच जगन्नाथ पिसाळ यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घेतले. अर्ध्या तासाने वाघमोडे व त्याचे सहकारी पुन्हा तेथे आले. त्यांनी गांगर्डे यांना शिवीगाळ करत धमकी दिली व निघून गेले. या गुन्ह्याचा अधिक तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...