आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेयी सुविधा:ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांच्या साेयी सुविधांकडे लक्ष द्यावे

टाकळीभान9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाकळीभान ग्रामस्थांच्या सुविधेसाठी निवडलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामस्थांचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांच्या साेयी सुविधांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांची आहे.जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष न देता स्वतःच्या गटात चालू असलेल्या तू-तू, मी-मी व अंतर्गत वादात दिवस निघून जात आहेत.

या वादात जनता होरपळून निघत आहे. पाऊस थांबल्याने गावात गवत वाढल्याने डासाचे प्रमाण वाढले आहे. गावातील दवाखाने व आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी दिसत आहे. फवारणी करायची सोडून ग्रामपंचायत ओटे बांधणे, शेड उभारणे याकडे लक्ष देत आहे. यापेक्षा साेयी सुविधांकडे लक्ष द्यावे, असा सूर ग्रामस्थांमधून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...