आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूवरून संघर्ष:आजी - माजी महसूलमंत्री विखे, थोरातांमध्ये खडी

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या अहमदनगर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांमध्ये खडी, वाळूवरून संघर्ष सुरू झाला आहे. थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघातील ५७ खडी क्रशर चालकांना विखे पाटील यांनी ७६५ कोटी रुपये दंड वसुलीची नोटीस बजावली आहे. त्यावर ही कारवाई पूर्णपणे राजकीय आहे. कोट्यवधी रुपयांचे दंड ठोठावून आणि खोटे गुन्हे दाखल करून उद्योजकांना हैराण करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. विशेष म्हणजे खडीविषयी राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी खडी मिळत नसल्याची तक्रार केली होती.

बातम्या आणखी आहेत...