आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:पालिका क्षेत्रातील निवासी अतिक्रमण धारकांना कायमस्वरुपी पट्टे द्यावे; नगरपालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

दर्यापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नगरपालिका क्षेत्रांतर्गत बनोसा, बाबळी व दर्यापूर या तिन्ही भागात ठिकठिकाणी झोपडपट्टी वसलेली असून, त्या झोपडपट्ट्या मागील ४० वर्षांपासून कायम आहेत. अराखीव नझुल सीट व नझुल प्लॉटवरील म्हणजे सार्वजनिक उपक्रमाकरिता राखीव न करण्यात आलेल्या जागांवरील निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबत शासनाने वेळोवेळी परिपत्रक व जीआर काढलेले असताना दर्यापूर नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ६ मधील आठवडी बाजार व आजूबाजूच्या परिसरात अराखीव जागांवर गेल्या ४० वर्षांपासून राहत असलेल्या झोपडपट्टी धारक अतिक्रमण नियमाकुल करणे न्यायदृष्ट्या आवश्यक आहे. याप्रकरणी प्रशासनाने योग्य दखल घेवून अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे, यासाठी उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर व नगरपालिका मुख्याधिकारी पराग वानखडे यांना समाजसेविका संगीता कट्यारमल यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले आहे.

शहरातील ठिकठिकाणच्या झोपडपट्टी परिसरात अनेक वर्षांपासून शासनाने लाखो रुपये निधी खर्च केला आहे. पक्के रस्ते,नाल्या, इलेक्ट्रॉनिक पोल व सर्व सुविधा पुरविल्या असून हे सर्व अतिक्रमणधारक नियमितपणे नगरपालिकेला कराचा भरणा सुद्धा करीत आहे. नगरपालिकेच्या अंतर्गत व इतर प्रभागांमधील अतिक्रमण धारकांना नियमाकुल करून त्यांना कायम पट्टे तथा पीआर कार्ड पुरविण्यात यावे व प्रभाग क्रमांक ६ मधील कित्येक वर्षांपासून अतिक्रमणधारक हे अद्यापही वंचित आहे. त्यामुळे पालीका क्षेत्रातील गोरगरीब निवासी अतिक्रमणधारकांना कायमस्वरुपी पट्टे देण्याची मागणी संगीता कट्यारमल यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देते वेळी अनुपमा शिंदे, शोभा ठाकूर, वंदना भुसारी, सविता शिंदे, आशा धनोकार, वंदना कपिले व रोशन कट्यारमलसह बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...