आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअत्यंत अल्पसंख्य असूनही सेवा व दानधर्म कार्यात माहेश्वरी समाजाचे योगदान मोठे आहे. येथील बंग दाम्पत्याने सर्वधर्मीय लोकांसाठी सेवा कार्याला वाहून घेत तालुक्याला समाजाची चांगली ओळख करून दिली, असे मत नगर जिल्हा माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष आनिष मनियार यांनी व्यक्त केले.
माजी नगरसेवक रामनाथ बंग व माजी उपनगराध्यक्ष दीपाली बंग यांना माहेश्वरी महासभेतर्फे महेश गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्त अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान, रामभाऊ मित्र मंडळ व बंग बहू -बेटी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गौरव सोहळ्याचे आयोजन कालिका मंगल कार्यालयात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महंत जगन्नाथ शास्त्री महाराज, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, जिल्हा सचिव अजय जाजू, उद्योजक राजेंद्र शेवाळे, तालुका अध्यक्ष मुकुंद लोहिया, श्रीकांत जाजू, गणेश बाहेती, रमण लाहोटी, उद्योजक कपिल अग्रवाल, ॲड. सचिन बडे, सहकार क्षेत्राचे अभ्यासक नाना राऊत, शंकर महाराज मठाचे महंत माधव बाबा, मौलाना सैफुद्दिन, हाजी दादा चौधरी, भैरवनाथ मंदिराचे दादा मर्दाने, शशिकांत सोनवणे, तालुका संघाचे संचालक अनिल गुगळे, समाजाचे ज्येष्ठ नागरिक रामभाऊ बजाज आदी उपस्थित होते. विविध संस्था व व्यक्तींतर्फे बंग दाम्पत्याचा गौरव करण्यात आला. जिल्हा सचिव अजय जाजू म्हणाले, जिल्हा सभेने जिल्ह्यातील तेरा व्यक्तींना विविध क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीबद्दल गौरवले. बंग दाम्पत्य म्हणजे पाथर्डीच्या सार्वजनिक जीवनाचा आदर्श पैलू असून संपूर्ण शहरातील विकास कामांसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. अभय आव्हाड म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून बंग दाम्पत्याकडून सर्व क्षेत्रात चांगले काम सुरू आहे. यापुढे त्यांनी शहराच्या सर्वांगीण उन्नती, प्रगती व जडणघडणीत सेवाभावी पद्धतीने योगदान द्यावे. राज्य पातळीवर पुरस्काराबाबत त्यांच्या कार्याचा विचार माहेश्वरी महासभेने करावा. प्रास्ताविक सचिन मुनोत, सूत्रसंचालन प्रा. मन्सूर शेख यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रशांत रोडी यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.