आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन‎:टपाल खात्याच्या योजना लोकाभिमूख‎ करण्यात महिला एजंटांचे मोठे योगदान‎

नगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ भारतीय डाक विभागाच्या विविध‎ योजना लोकाभिमुख करण्यात मोठं‎ योगदान असणाऱ्या महिला प्रधान‎ एजंट यांचे काम अभिमानस्पद‎ आहे, असे प्रतिपादन केडगावचे‎ पाेस्टमास्तर संतोष यादव यांनी‎ केले.‎ केडगाव टपाल कार्यालयात‎ आयोजित महिला दिन कार्यक्रमात‎ ते बोलत होते. समाजात घरोघरी‎ संपर्क पोस्टाच्या आरडी योजनेचे‎ काम करणाऱ्या महिला प्रधान एजंट‎ या पोस्टाच्या विविध योजना‎ लोकाभिमुख करण्यात महत्त्वाची‎ भूमिका बजावतात,सर्वच‎ घटकातील नागरिकांना बचतीचे‎ सवय लावत त्याची ठेव पोस्टाच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सुरक्षित योजनेत गुंतवितात‎ त्याच्याद्वारे हे महत्त्वाचे काम होते.‎

त्यामुळे त्यांना समाज व्यवस्थेत‎ मानाचे स्थान आहे. आजच्या या‎ संगणकाच्या युगात टपाल‎ कार्यालयाच्या कामकाजात वेगाने‎ बदल होत अाहे. महिला प्रधान‎ एजंट यांच्याही कामकाजात ही‎ मोठया प्रमाणात बदल झालेला‎ आहे. तो स्वीकारत त्या‎ काळजीपूर्वक काम करत आहेत.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ही अभिमानाची बाब आहे.‎ महिला दिनानिमित्त उल्लेखनीय‎ काम करणाऱ्या महिला प्रधान एजंट‎ लता कोरे, पंकजा धर्म, कुसुम‎ रोहकले, अंजली जोशी, संगीता‎ शर्मा, वंदना संचेती, भारती झावरे,‎ डाक विभागातील शुभांगी मांडगे,‎ सविता ताकपेरे, श्वेता बिरुदवडे,‎ वैष्णवी बहिर, ऋतुजा देवकर,‎ कल्पना घोडे यांचा विशेष गौरव‎ डाक अधीक्षक जी हनी यांनी केला.‎

बातम्या आणखी आहेत...