आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार प्रदान:पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयास ग्रीन व क्लिन कॅम्पस पुरस्कार

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, प्रवरानगर या महाविद्यालयास ज्ञानज्योती बहुउद्देशिय संस्था, टाकळीभान आयोजित राज्यस्तरीय ग्रीन व क्लिन कॅम्पस पुरस्कार बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये एकूण ३६ एकराच्या परिसरामध्ये विविध प्रकारची औषधी, जंगली, शोभेची तसेच विशेष म्हणजे जवळपास पाचशे पेक्षा जास्त नारळाची झाडे आहेत.

म्हणून या महाविद्यालयाला जिल्ह्यातील मिनि कोकण म्हणून ओळखण्यात येते. या महाविद्यालयामध्ये वनस्पती उद्यान, औषधी वनस्पतींची रोपवाटीका, हरितगृह इ. सुविधा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली. तसेच वेळोवेळी संस्थेचे ग्रीन ऑडीट व एनर्जी ऑडीट देखील केले जाते. या सर्व बाबींचा विचार करुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय सलग तीन वेळा या महाविद्यालयाने प्राप्त केला आहे. त्याचबरोबर नॅक समिती, बँगलोर यांनी सलग तिन वेळा ‘अ’ दर्जा देऊन सन्मानित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...