आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्त्री-पुरुष समता, जातीनिर्मूलन, संसाधनांचे फेरवाटप, ज्ञाननिर्मिती, धर्मचिकित्सा, आंतरजातीय विवाह आणि सामाजिक न्याय अशा अनेक समाजसुधारणेच्या कार्यामुळे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम करणारे जोतिराव फुले यांना जनतेने ‘महात्मा’ पदवी देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला. त्यांच्या समाज सुधारणेमुळे आज वंचित घटकांना त्यांचे न्याय हक्क मिळू लागले. त्यांच्या महान कार्याची दखल घेत जनतेने त्यांना ‘महात्मा’ पदवी दिली. आताच्या सरकारनेही जनभावनेचा आदर राखत त्यांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करावे, अशी मागणी श्रीविशाल गणेश मंदिर देवस्थानचे विश्वस्त तथा राष्ट्रवादीचे नगर शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांनी केली.
११ मे १८८८ रोजी क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली. हा दिवस ‘महात्मा दिन’ म्हणून सर्वत्र साजरा होत असतो. त्यानिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास श्रीविशाल गणेश मंदिर देवस्थानचे विश्वस्त तथा राष्ट्रवादीचे नगर शहर जिल्हाध्यक्ष प्रा. विधाते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विश्वस्त अशोकराव कानडे, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दीपक खेडकर, विष्णूपंत म्हस्के, बजरंग भुतारे, बंडू आंबेकर, नाना लोखंडे, मयुर भापकर, श्रीकांत आंबेकर, महेश सुडके, गणेश बोरुडे, सागर शिरसाठ आदि उपस्थित होते. याप्रसंगी अमित खामकर म्हणाले, सामान्य माणसांनी आपल्या उद्धारकर्ते ज्योतीबा फुले यांना ‘महात्मा’ अशी पदवी देऊन सन्मानित करण्याची ही देशातील पहिलीच घटना होती. आज या घटनेला १३४ वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्ताने महात्मा जोतिराव फुले यांचे अंगभूत गुण आपण आपल्या आत्मसात करावे, असे सांगितले. याप्रसंगी कानडे, दीपक खेडकर आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मयुर भापकर यांनी केले. श्रीकांत आंबेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.