आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षाचे स्वागत:मनोरुग्णांची सुश्रृषा ही ईश्वर सेवाच ; आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन, मनगाव प्रकल्पाला भेट

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.राजेंद्र व सुचिता धामणे दांपत्य यांनी खऱ्या अर्थाने मानव सेवेचा वसा घेतला आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आजच्या युवा पिढीसमोर एक आदर्श असे काम उभे केले आहे. मनगाव प्रकल्पातील मनोरुग्णांची सुश्रृषा ही ईश्वर सेवा आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागताचा अहमदनगरमध्ये तरुणाईचा सर्वत्र जल्लोष सुरू असतानाच, आमदार जगताप यांनी नववर्षाची सुरुवात मनोविकलांगांच्या सेवेने सुरू केली. आमदार जगताप यांच्या या मानवसेवेने मनगावचे प्रकल्प संचालक डॉ. राजेंद्र आणि डॉ. सुचिता धामणे ही दांपत्य भारावून गेले. आमदार संग्राम जगताप यांचे मनगाव प्रकल्पाला नेहमीच सहकार्य असते आणि त्यांच्या विधायक कामाचा संकल्प मानवसेवेतून होतो”, आमदार संग्राम जगताप हे सामाजिक जाणीव असणारी भूमिका समाजात मांडणे व युवकांना एक आदर्श ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. राजेंद्र धामणे यांनी दिली.

आमदार जगताप यांनी सरत्या वर्षाचा निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील देहरे येथील मनगाव प्रकल्पाला भेट दिली. यावेळी आमदार जगताप यांनी प्रकल्पातील मनोविकलांग रुग्णांशी संवाद साधला. यावेळेस डॉ. राजेंद्र आणि डॉ. सुचिता धामणे दांपत्य उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार, जॉय लोखंडे, राहुल ठोंबरे, संतोष ढाकणे, वैभव ढाकणे, वैभव वाघ, विशाल पवार, मळू गाडळकर, चेतन भळगट, मयूर कुलथे, संतोष लांडे, विजय सुंबे, श्री गारडे, शंकर नरसाल, विशाल बेलपवार, शुभम जगताप आदी उपस्थित होते.

प्रकल्पामुळे नगरचे नाव जगात उंचावले डॉ. धामणे दांपत्य यांच्या सेवाभावी वृत्तीतून मानसिक विकारांनी पीडित असलेल्या रुग्णांसाठी मनगाव प्रकल्प उभा केला आहे या सेवाभावी प्रकल्पामुळे आपल्या नगर जिल्ह्याचे नाव जगामध्ये उंचावले आहे. डॉ.धामणे पती-पत्नी यांनी ज्यांना परिवाराने नाकारले त्यांना मायेचा निवारा माऊलीच्या माध्यमातून देत या प्रकल्पातील मनोरुग्णांची सेवा करत आहे असे आमदार जगताप म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...