आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'जागतिक तंबाखू विरोधी दिन' हा फक्त एक दिवसापूरता साजरा न करता प्रत्येकाने वर्षभर साजरा करणे आवश्यक आहे. आजकालच्या तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता चिंताजनक आहे. अशी खंत अहमदनगरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांनी बुधवारी व्यक्त केली.
अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशन, सेंट्रल बार असोसिएशन, गरुड कॅन्सर हॉस्पीटल आणि रेडीएशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयात आयोजित जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या कार्यक्रमात यार्लगड्डा बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांच्या सचिव रेवती देशपांडे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अनिल सरोदे, जिल्हा सरकारी वकील अॅड. सतिष पाटील, डॉ. पद्मजा गरूड, डॉ.प्रकाश गरूड आदी उपस्थित होते.
न्यायाधीश यार्लगड्डा म्हणाले, तंबाखूमुळे फक्त कॅन्सरच होतो का ? कॅन्सर हा फक्त तंबाखूमुळेच होतो का ? यावर समाजात जागृती करण्याच काम वैद्यकीय पेशातील लोकांनी करावे. रेवती देशपांडे म्हणाल्या, तंबाखूच्या सेवनाने कॅन्सरजन्य रोग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपल्या कुटूंबाची वाताहत ही होऊ शकते. तेव्हा प्रत्येकाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ यांच्या सेवनापासून दूर रहावे. असे आवाहन त्यांनी केले.
हृदयविकारानंतर कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण
कॅन्सर तंज्ञ डॉ. प्रकाश गरुड म्हणाले, आपल्या देशात हृदयविकारानंतर कर्करोगाचे सर्वात जास्त रूग्ण आहेत. कर्करोगाच्या रूग्णांपैकी 50 टक्के रूग्ण हे तंबाखुमुळे होणाऱ्या कर्करोगाचे आहेत. भारत हा एकमेव देश आहे जिथे तंबाखुचे दुकाने आहेत. प्रत्येक वर्षाकाठी भारतामध्ये 112 कोटी किलो तंबाखुची विक्री केली जाते. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थामुळे कर्करोगाचे वाढते प्रमाण भारतामध्ये मोठया प्रमाणात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.