आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावस्तू व सेवा कराच्या नोंदणी प्रमाणपत्राचा अर्ज मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. अर्जदाराने थेट सीबीआयच्या अँटी करप्शन ब्युरोकडे याची तक्रार केली. सीबीआयनेही तत्काळ दखल घेत दोन दिवसात सापळा रचून कारवाई केली. नगर येथील केंंद्रीय उत्पादन शुल्क व वस्तू व सेवा कर कार्यालयातील वस्तू व सेवा कर अधीक्षकासह निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
अधीक्षक विजयकुमार राऊत (वय ५५, रा. राहिंजमळा, केडगाव, नगर) व निरीक्षक मुरली मनोहर (वय २७, रा. अमितनगर, नगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता जिल्हा न्यायाधीश एस. गोसावी यांनी दोघांनाही ७ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.