आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक बदल्या वादात‎:दिव्यांगत्व तपासणीकडे पालकमंत्री‎ राधाकृष्ण विखे यांचे वेधले लक्ष‎, तपासणीची केली मागणी

नगर‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेत २०२२ मध्ये झालेल्या‎ शिक्षक बदली प्रक्रियेत दिव्यांगत्वाचे‎ प्रमाणपत्र सादर करून लाभ‎ घेतलेल्या शिक्षकांच्या दिव्यांगत्वाची‎ तपासणी करण्याच्या मागणीसाठी‎ सावली दिव्यांग संघटनेने उपोषण‎ केले होते. त्यावेळी प्रशासनाने‎ तपासणी करण्यास सहमती‎ दर्शवल्यानंतर उपोषण मागे घेण्यात‎ आले होते.

तथापि, आजतागायत‎ दिव्यांगत्व तपासणीसाठी‎ प्रशासनाकडून ठोस पावले न‎ उचलल्याने, बाबासाहेब महापुरे यांनी‎ पालकमंत्र्यांचे या प्रश्नाकडे लक्ष‎ वेधून दिव्यांगत्व तपासणीची मागणी‎ केली.‎ जिल्हा परिषदेत झालेल्या शिक्षक‎ बदली प्रक्रियेत दिव्यांग प्रमाणपत्र‎ सादर करणाऱ्या शिक्षकांच्या‎ दिव्यांगत्वाच्या तपासणीचा मुद्दा चर्चेत‎ आहे.

या पार्श्वभूमीवर सावली दिव्यांग‎ संघटनेने संबंधित शिक्षकांच्या‎ दिव्यांगत्वाच्या तपासणीसाठी २८‎ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत‎ उपोषण केले होते. त्यावेळी प्रशासनाने‎ तक्रार असलेल्या शिक्षकांची नावे‎ विचारली होती, त्यावर संघटनेकडून‎ सुमारे ३४५ शिक्षकांची यादी सादर‎ करण्यात आली होती.

त्यानंतर जिल्हा‎ परिषद प्रशासनाला या आश्वासनाचा‎ विसर पडून, दिव्यांगत्व तपासणी थंड‎ बस्त्यात गुंडाळण्यात आली. सावली‎ दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब‎ महापुरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण‎ विखे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे‎ की, मुख्य कार्यकारी अधिकारी व‎ शिक्षणाधिकाऱ्यांकडून याबाबत‎ कार्यवाही करण्याची मानसिकता‎ नसल्याने आम्ही विभागीय आयुक्त‎ कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा‎ दिला होता.

त्यानंतर पुन्हा‎ शिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यवाही‎ प्रस्तावित केल्याचे कळवले आहे.‎ पाच महिन्यांपासून मागणी करत‎ असतानाही, मुख्यकार्यकारी‎ अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांकडून‎ कार्यवाहीस दिरंगाई होत आहे.‎ त्यामुळे बदलीस पात्र ठरलेल्या‎ शिक्षकांच्या दिव्यांगतवाची शारिरीक‎ तपासणी झाली तर खरे दिव्यांग व‎ बनावट दिव्यांग याची सत्यता समोर‎ येईल. त्यामुळे सरसकट तपासणीची‎ मागणी मंत्री विखे यांच्याकडे‎ केल्याचे महापुरे यांनी सांगितले.‎